मुंबई : कार, बाईक आणि इतर कोणतंही वाहन चालवणाऱ्यांना आता पीयूसी काढणे सक्तीचे करण्यात आले आहे. वाहनधारकांकडे पीयूसी नसेल तर कोणतीही विमान कंपनी त्या वाहनाला विमा कवच पुरवणार नाही, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.  इश्यूरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे इरडाने लागू केलेल्या निर्देशांनुसार आता पीयूसी असल्याखेरीज कोणतीही कंपनी वाहन विमा करणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्ट २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत. पण त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे कंपन्यांना पीयूसीची अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.


एखादे  वाहन हवेत किती कार्बन सोडते हे मोजणारे प्रमाणपत्र म्हणजे पीयूसी. प्रदूषण नियंत्रणासाठी हे प्रमाणपत्र फार महत्त्वाचं आहे. मात्र, वाहनचालक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. आता पीयूसीशिवाय विमाच मिळणार नसल्याने हे पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे.