मोदींच्या विकास कामांचं कौतुक करणारी रश्मिका मंधाना सोशल मीडियावर ट्रोल, युजर्स म्हणाले दुसरी `कंगना`
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तीने पीएम मोदींच्या विकास कामांचं कौतुक केलं. पण यावरुन सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाला (Rashmika Mandana) आपल्या एका वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल व्हावं लागलं आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. या दरम्यान मोदींच्या विकासाकामांचं कौतुक करणं तिला भोवलं आहे. सोशल मीडियावर युजर्सने तिला ट्रोल (Trolled) करण्यास सुरुवात केली आहे. रश्मिकाच्या या वक्तव्याकडे आता निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलें जात आहे. मंगळवारी एएनआयशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
काय म्हटलं होतं रश्मिकाने?
रश्मिका मंधानाने एएनआयशी बोलताना मुंबईतल्या अटल सेतूचं (Atal Setu Bridge) कौतुक केलं होतं. अटल सेतूचं उद्घाटन पीए नरेंद्र मोदी यांनी याचवर्षी जानेवारी महिन्यात केलं होतं. यावर बोलताना रश्मिकाने 'आता 2 तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटात करु शकतो. यावर खरं तर विश्वासच बसत नाही. असं काही शक्य होऊ शकतं का असा कोणी विचार केला नसेल, असं वक्तव्य केलं. मुंबई ते गोवा, गोवा ते मुंबई आणि बंगळुरुपासून मुंबईपर्यंतचा प्रवास सहज आणि सोपा झाला आहे. इतक्या उत्तम पायाभूत सुविधा उभारल्याचं पाहून मला फार अभिमान वाटत आहे' अशी भावना रश्मिकाने व्यक्त केली आहे.
का ट्रोल झाली रश्मिका?
रश्मिकाच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. एका युजरने रश्मिकाला दुसरी कंगना असल्याचं म्हटलं आहे. तर एका युजरने Shame on you असं म्हटलंय. तर एका युजरने एसी गाडी आणि स्टुडिओतन शेवटची बाहेर कधी निघाली होती? असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने तर तिला विरार लोकलमधून प्रवास कर, म्हणजे विकासकामं कळतील असं आव्हन केलं आहे.
पण काही लोकांनी रश्मिकाला पाठिंबाही दिला आहे. विरोधकांचे चमचे आता रश्मिकालाही अंधभक्त म्हणतील असं म्हटलं आहे. तर एकाने मोदी है तो मुमकीन है असं सांगत तिला पाठिंबाल दिलाय.
रश्मिकाचं नेमकं वक्तव्य
मुंबईतील अटल सेतू पाहिल्यानंतर असं काही होऊ शकतं याची कोणी कल्पना केली नसेल, आता आपण सहजपणे मुंबई ते नवी मुंबई प्रवास करु शकतो. भारत आता फार वेगाने प्रवास करत असून, गतीने विकास होत आहे. आता कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही असं रश्मिकाने म्हटलं आहे. अटल सेतूचं काम फक्त 7 वर्षांत पूर्ण झालं आहे. 20 किमीचा हा पूल फक्त 7 वर्षांत उभा करणं हे जबरदस्त आहे. माझ्याकडे कौतुकासाठी शब्द नाहीत भारताला आता कोणीही थांबवू शकत नाही. भारतासाठी अशक्य असं आता काही नाही, ज्याप्रकारे गेल्या 10 वर्षात भारताने विकास केला आहे, पायाभूत सुविधा, रस्त्यांची योजना हे सगळंच जबरदस्त आहे" असंही रश्मिका म्हणाली आहे.