Crime Story of Mumbai Based Hawkar: काही वर्षांपुर्वी गळ्यात ब्लेडची पाकिटं लटकवून मुंबईच्या झोपडपट्टी भागात राहणारा एक फेरीवाला आज चक्क 10 कोटींचा मालक बनला आहे. ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. या फेरीवाल्याची ही कहाणी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 2005 साली हा फेरीवाला ब्लेडसारख्या वस्तूची विक्री करायचा. (trending news this hawker who has earned 10 crores aquires luxury house and cars)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या अंगावर गळ्यात ब्लेडची पाकिटं लटकवून मुंबईतल्या लोकलमध्ये हा इसम रोज ब्लेड विकायचा. परंतु या 15 वर्षांमध्ये त्यानं असं काय केलं आणि तो दहा कोटी रूपयांचा मालक झाला असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असलेच. 


या फेरीवाल्याचं नाव आहे संतोष कुमार सिंह उर्फ बबलू. ब्लेड विकतानाच संतोषनं काही लोकांना जमवून त्यानं एक टोळी तयार केली. सीएसएमटी ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यानं आपल्या या टोळीच्या माध्यमातून रॅकेट चालवायला सुरूवात केली. ही टोळी स्टेशन आणि गाड्यांमधल्या फेरीवाल्यांना गाठून त्यांच्याकडून ही टोळी खंडणी उकळत असे. 


खंडणीचा आकाडा 500 रूपयांपासून ते 5 हजारांपर्यंत असा होता. हा प्रकार दररोज होत होता. या फेरीवाल्यांनी जर पैसे दिले नाहीत तर संतोष आणि त्यांचे गुंड त्यांची मारहाण करायचे. या खंडणीतून त्यानं तब्बल 10 कोटींची मालमत्ता जमा केली. परंतु हा प्रकार फार काळ टिकून राहिला नाही. संशय आल्यानंतर पोलिसांनी संतोषला आणि त्याच्या टोळीला गजाआड केलं. 


पोलिसांनी संतोषसह त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्याची बेनामी मालमत्ताही जप्त केली आहे. पोलिस यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपली बायको शिकवण्या घेते आणि आपला गारमेंटचा व्यवसाय आहे अशी बतावणी संतोष करत होता.


हा प्रकार अतिशय धक्कादायक असून अशा लोकांना गजाआड करणं हे पोलिसांपुढील आता मोठं आव्हान आहे. 



काय काय आहे त्याच्याकडे? संतोषनं आणि त्याच्या टोळीनं खंडणी जमा करून करून त्यांनी मुंबईत दहा घरं, 1.5 किलो सोनं, उत्तर प्रदेशात पाच एकर जमीन, बॅंकेत 12 लाख रूपये, फॉर्चूरसह दोन कार अशी मालमत्ता संतोषकडे आहे.