मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete ) यांचं रविवारी सकाळी भीषण अपघातात निधन झालं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर ही घटना घडली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मेटेंच्या अपघाती निधनानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्यावर त्यांना जवळपास 1 तास मदत मिळाली नाही. जर त्यांना वेळेवर मदत मिळाली असती तर आज ते आपल्यासोबत असते, असं एकनाथ कदम हे म्हणाले. एकनाथ कदम हे विनायक मेटे यांचे सहकारी होते आणि दुर्घटनाग्रस्त गाडीत एकनाथ कदमही मेटेंच्या सोबत होते. (trending news vinayak mete accident vinayak mete didnt get help for an hour after the accident in marathi)



गाडीला अपघात झाल्यानंतर विनायक मेटेंना तासभर मदत मिळाली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी 100 नंबरवरही कॉल लावला पण कोणी उचलला नाही. त्यांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या गाडींनाही मदत मागितली पण एकही गाडी थांबली नाही. अखेर त्यांना रस्त्यावर झोपून मदत मागण्याची वेळ आली, अशी माहिती कदम यांनी दिली. 


धक्कादायक म्हणजे त्यांनी ज्यांना कोणाला फोन लावले त्यांनी कोण विनायक मेटे? कोणते आमदार आम्हाला माहिती नाही असे कर्मचाऱ्यांकडून उत्तरं मिळाली, असं कदम म्हणाले. हे कर्मचारी पूर्ण झोपेत होते, असेही ते म्हणाले. 


मेटेंच्या जीव वाचविण्यासाठी कदम मदतीसाठी याचना करत होते पण कोणीही त्यांना दाद देत नव्हतं. अखेर रस्त्यावरुन जात असणाऱ्या एका टेपोने माणुसकी म्हणून मदतीचा हात पुढे केला. तासाभरानंतर रुग्णवाहिका आली. त्यानंतर विनायक मेटेंना रुग्णालयात नेण्यात आलं.



मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अनेक अपघाताच्या घटना घडत असतात. जर एखाद्या आमदारावर ही वेळ येत असेल तर सामान्य माणसाचं काय होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.