Mumbai Local Train Accident Video : मुंबईकर लोकल ट्रेनच्या वेळेवर धावतं असतात. एक ट्रेन चुकली की त्यांचं दिवसभराचं गणित चुकतं. म्हणून प्रवाश्यांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये मुंबईकर दारावर उभे राहून प्रवास करतात. कधी कधी काही लोक तर अगदी ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करतात. एवढंच नाही तर धावती ट्रेन पकडतात. मात्र आपण सोशल मीडियावर अनेक धावती ट्रेन पकडता झालेल्या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. 


माय-लेकी पडल्या आणि मग...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या सीसीटीव्ही फूटेजमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी लोकल ट्रेनमध्ये चढली, तिच्या पाठोपाठ तिची आई ट्रेनमध्ये चढायला गेली आणि लोकल सुरु झाली. मुलीने आईला हात देऊन ट्रेनमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला पण आईचा तोल गेला आणि ती मुलीला घेऊन प्लॅटफॉर्मवर पडली.  (trending video women and daughter falls running local train viral on Social media and Mumbai Local news )


 


हेसुद्धा वाचा - Video : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...



देव तारी त्याला कोण मारी!


नशीब चांगलं होतं म्हणून प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका प्रवासी आणि आरपीएफ कॉन्स्टेबल यांचा दक्षतेमुळे या माय लेकीचे प्राण वाचले.  



हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. खुद्द RPF INDIA यांनी हा व्हिडिओ लोकांनी सतर्क व्हावे म्हणून शेअर केला आहे.