Video : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...

viral video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. त्यातील सर्वात ट्रेंड होतात ते महिलांच्या डब्ब्यातील व्हिडिओ...

Updated: Dec 18, 2022, 12:07 PM IST
Video : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं... title=
trending video Mumbai Local Train women and girls wwe fight viral on Social media nmp

Mumbai Local Video : प्रत्येक मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन (Mumbai Local Train) हा अजून काही त्यांचा श्वास आहे. कारण या लोकल ट्रेनवर लाखो मुंबईकरांचं (Mumbai news) आयुष्य अवलंबून आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या लोकल ट्रेनचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. सकाळीची ऑफिसची घाई असो किंवा ऑफिस सुटल्यावर घरी जाण्याची लगबग ही लोकल ट्रेन (Mumbai Local video) कायम खचाखच भरलेली असते. 

आणि बस्स एवढंच कारण पुरेसं होतं...

हा सुखद आणि जलद प्रवास अनेक वेळा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतो. या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे. तो पाहून तुम्हीही कपाळाला हात मारून घ्याय. 

व्हिडिओ व्हायरल 

या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता, लोकल ट्रेनमध्ये तुफान गर्दी आहे. एकमेकांना चिपकून महिला तरुणी उभ्या आहेत. अशात लोकल ट्रेनमधील सीटवरुन एक नाही दोन नाही, चार महिलांनी जोरदार राडा केला. केस ओढताना, धक्काबुक्की करताना या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. (trending video Mumbai Local Train women and girls wwe fight viral on Social media)

 

हेसुद्धा वाचा - Video : त्याने तिला मिठ्ठीत घेतलं अन् मग...

 

लोकल ट्रेनमध्ये दंगल 

या महिलांनी लोकल ट्रेनच्या डब्ब्याला दंगलीचा आखाड करुन टाकला. या महिलांची दे धपाधप wwe ची जबरदस्त फाईट पाहिला मिळतं आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठल्या लोकल ट्रेनमधील आहे याबद्दल कुठलीही माहिती मिळालेली नाही.

मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर हा व्हिडिओ @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.