मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामींना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलेअर मीडियाची याचिका हायकोर्टानं दाखल करून घेतली. दरम्यान या प्रकरणाचा तपास 12 आठवड्यांत पर्ण करू, राज्य सरकारने हायकोर्टात ग्वाही दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून दिलेला दिलासा रद्द करण्यात आला. मात्र यादरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची आवश्यकता भासल्यास त्यांनी तीन दिवस आधी तशी नोटीस देणं बंधनकारक असल्याचे कोर्टाने म्हटलंय. 28 जूनला हायकोर्टात याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.


रिपब्लिक टीव्ही आणि एआरजी आऊटलायर मीडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मानला जातोय. अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी लागेल असे मुंबई हायकोर्टाच्या अंतरिम आदेशात म्हटलं गेलंय.



आतापर्यंत काय घडलंय ?


सध्या याप्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एका आरोपीने ‘रिपब्लिक’वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी दरमहा १५ लाख रूपये  मिळत असल्याचे कबुल केले. अभिषेक कोळावडे असं या आरोपीचं नाव आहे. कृत्रिमरित्या टीआरपी वाढविण्यासाठी जानेवारी ते जुलै हे सात महिने आरोपीला दरमहा १५ लाख रूपये मिळत होते. म्हणजे दरमहा १५ लाख रूपये प्रमाणे मिळणारी रक्कम १ कोटी रूपयांच्या घरात आहे. वरील गोष्टीची माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात  दिली आहे. 


त्याचप्रमाणे यातील काही रक्कम वितरक असलेल्या आशीष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली असून उर्वरित रक्कम हवाला माध्यमातून आल्याचे त्याने म्हटले आहे. आशी माहिती मिळताच पोलिसांनी चौधरीच्या घराची आणि ऑफिसची झडती घेतली. यामध्ये ११ लाख ७२ हजार रुपये अभिषेक याच्या घरातून दोन लाख रुपये तर, अशीष याच्या कंपनी कार्यालयातून हस्तगत करण्यात आले.


दरम्यान, मॅक्स मीडिया चालवणाऱ्या अभिषेक कोळावडेने चौकशीमध्ये आशीष चौधरीचं नाव घेतल्याने २८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस अद्यापही चौकशी करत आहेत. याशिवाय याप्रकपरणी  अन्य आरोपी रमजी वर्मा, दिनेश विश्वकर्मा आणि उमेश मिश्रा यांची देखील नावे समोर आली आहेत.