मुंबई : ठाण्याजवळील कोपरी येथे पूर्व द्रुतगती महामार्गावर (Eastern Expressway ) एका ट्रकला अपघात झाला. (Truck crash on Eastern Express in Mumbai) त्यानंतर रस्त्यावर लाख चिखलाचे साम्राज्य दिसून आले. अपतामुळे ट्रकमधील सुमारे 20 टन टोमॅटो महामार्गाच्या दोन्ही बाजुला पसलेले दिसून येत होते. मात्र, या टोमॅटोमुळे लाल चिखल झाल्याचे पाहायला मिळाले. अपतामुळे  ईस्टर्न एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. हा ट्रक बाजुला करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईस्टर्न एक्स्प्रेसवरील ठाणे कोपरी येथे आज पहाटे दोनच्या सुमारास टोमॅटोने भरलेला ट्रक पलटी झाल्याने एकजण जखमी झाला. यावेळी सुमारे 20 टन टोमॅटो महामार्गाच्या दोन्ही बाजुला पसरलेले होते.  टोमॅटो एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की ते बाजूला काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली.  या अपघातनंतर 'लाल चिखल' हा बालभारतीच्या अभ्यासक्रमातील धडा डोळ्यापुढे सरकला.  या लाल चिखल धड्याची आठवण करुन देणारी एक घटना ठाण्यामध्ये घडल्याची चर्चा होती.