देशभरातल्या मालवाहतूकदारांचा संप
मालवाहतुकीवर नेमका किती जीएसटी आकारावा, याबाबत असलेली संदिग्धता आणि वाढलेल्या डिझेल किंमतीच्या निषेधार्थ देशभरातल्या ट्रकचालकांनी संप सुरू केलाय.
नवी मुंबई : मालवाहतुकीवर नेमका किती जीएसटी आकारावा, याबाबत असलेली संदिग्धता आणि वाढलेल्या डिझेल किंमतीच्या निषेधार्थ देशभरातल्या ट्रकचालकांनी संप सुरू केलाय.
रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ऑल इंडिय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या झेंड्याखाली हा संप पुकारण्यात आलाय. या संपामुळं पुढचे दोन दिवस मालाचं बुकिंग आणि वाहतूक होऊ शकणार नाहीय. मुंबईच्या वाशी टोलनाक्याच्या आधीच ट्रान्सपोर्ट युनियननं सर्व ट्रक अडवलेत.
दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपलाय. नेमका याचवेळी ट्रकचालकांनी संप पुकारल्यानं बाजारावर त्याचा परिणाम झालाय. दरम्यान, दिवाळी असल्यानंच केवळ दोन दिवसांचा संप सुरू केलाय. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दिवाळीनंतर बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा युनियननं दिलाय.