तिकिट कापल्याने तृप्ती सावंत, अशोक पाटील समर्थकांचा मातोश्रीसमोर ठिय्या
वांद्रे पूर्व मतदारसंघातून मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघातून मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलण्यात आलंय. तसंच भांडुपमधील विद्यमान आमदार अशोक पाटील यांनाही डावलण्यात आलंय.
त्यांच्या ऐवजी रमेश कोरगांवकर यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे तृप्ती सावंत आणि अशोक पाटील यांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला होता. अशोक पाटील यांचं तिकिट कापण्यामागचं कारण काय हे सांगण्यात आलं नाही.
उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी न देण्याचं कारण सांगावं, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. तर तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व येथील विद्यमान आमदार आहेत. २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या.