मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूरचे सीईओ असताना, गैरहजर शिक्षकांवर केलेली कारवाई सर्वात जास्त गाजली. यामुळे नागपूर जिल्ह्यातील 
जि.प.च्या गैरहजर शिक्षकांना घरचा रस्ता दाखवला, ही तुकाराम मुंढे यांची पहिली आक्रमक कारवाई होती.


पहिली आक्रमक कारवाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर जिल्हा परिषदेवर २००८ साली सीईओ म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली, नियुक्ती मिळाली आणि तुकाराम मुंढे यांनी, त्याच दिवशी काही शाळांना भेट दिली. या भेटीत तुकाराम मुंढे यांना भयानक वास्तव दिसलं, जे तुकाराम मुंढेंचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं, त्या शाळांची अशी स्थिती पाहून, तुकाराम मुंढे अधिक आक्रमक झाले.


ग्रामीण शिक्षण व्यवस्था वाचवण्याचं काम


ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा या ग्रामीण शिक्षणाचा कणा आहेत, गरीब शेतकरी, मजूर, दलितांची मुलं आजही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात, तेव्हा तिथली व्यवस्था सुधारणं गरजेचं होतं.


जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांवर नजर


तुकाराम मुंढे यांनी आपली पहिली भेट, जिल्हा परिषदेचे सीईओ झाल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांना दिली. तो त्यांचा नागपूर जिल्हा परिषदेचा सीईओपदाचा पहिलाच दिवस होता. 


सर्व गैरहजर शिक्षकांचे निलंबन


शाळांमध्ये पोहोचल्यानंतर, अनेक शिक्षक तुकाराम मुंढे यांना गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व गैरहजर शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून शिक्षकांचं गैरहजेरीचं प्रमाण १० ते १२ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आलं.