रिटायर्टमेंटनंतर 2 लाख पेन्शन हवीय मग आता किती पैसे गुंतवावे लागतील?

आजच्या काळात मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल कर किमान दरमहा 50 हजार रुपये इतका खर्च येतो. 

| May 11, 2024, 17:54 PM IST

NPS Retirement Investment: आजच्या काळात मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल कर किमान दरमहा 50 हजार रुपये इतका खर्च येतो. 

1/11

रिटायर्टमेंटनंतर 2 लाख पेन्शन हवीय मग आता किती पैसे गुंतवावे लागतील?

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

NPS After Retirement: तरुण असताना नोकरीधंदा करुन प्रत्येकजण काहीना काही कमाई करत असतो. पण निवृत्तीनंतर काय? याचे प्लानिंग प्रत्येकाला तरुणवयातच करावे लागते. निवृत्तीनंतर आपल्याला दरमहिन्याला किती रुपयांची गरज लागू शकते? त्याप्रमाणे आतापासून गुंतवणूक करायला हवी. 

2/11

दरमहा 50 हजार रुपये इतका खर्च

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

आजच्या काळात मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल कर किमान दरमहा 50 हजार रुपये इतका खर्च येतो. या रक्कमेत तुम्ही तुमचे घर भाडे, वाहन खर्च, तुमचे खाणेपिणे आणि प्रवास चांगल्या प्रकारे मॅनेज करु शकता.

3/11

आज तुम्ही 30 वर्षांचे असाल तर...

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

समजा आता तुमचे वय 30 वर्षे असेल आणि 30 वर्षांनंतर, म्हणजे वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही रिटार्टमेंट घेताय.  त्यानंतर तुम्हाला काहीही कष्टाचे काम न करता जीवन जगायचे असेल, तर त्यावेळी तुम्हाला आजच्या तुलनेत 3-4 पट पैसे लागू शकतात. 

4/11

दरमहा 2 लाख रुपये पेन्शन कशी मिळेल?

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

म्हणजे आता तुम्हाला 50 हजार खर्च येत असेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा सुमारे २ लाख रुपयांची गरज भासेल. असे असेल तर आता दरमहा किती पैसे गुंतवल्यास निवृत्तीनंतर मला दरमहा 2 लाख रुपये पेन्शन मिळेल? असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर जाणून घेऊया.

5/11

निवृत्तीनंतर तुमच्याकडे 2 पर्याय

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

तुम्ही निवृत्त झाल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय असतील. एकतर तुम्ही तुमचे सर्व पैसे ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवा आणि त्यातून पेन्शन घेणे सुरू करा. किंवा 60 टक्के रक्कम काढा आणि उर्वरित 40 टक्के रक्कमेची वार्षिकी योजना बनवा. 

6/11

वार्षिकी योजनेत गुंतवणूक

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

निवृत्तीनंतर, एनपीएसच्या किमान 40 टक्के रक्कम वार्षिक योजनेत गुंतवावी लागते. तुम्ही तुमचा संपूर्ण निधी वार्षिकी योजनेत गुंतवला आणि त्यावर पेन्शन मिळेल. 

7/11

किती कॉर्पस?

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

सध्याचे एफडीचे दर जवळपास 6 ते 7 टक्के आहेत. तुम्ही निवृत्त झाल्यावर तुम्हाला किमान 5 टक्के व्याज मिळेल. जास्त व्याज मिळाल्यास जास्त फायदे मिळेल.

8/11

5 टक्के दराने व्याज

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 2 लाख रुपयांची गरज असेल तर तुम्हाला वार्षिक 24 लाख रुपयांचे व्याज लागेल. जर तुम्हाला 5 टक्के दराने 24 लाख रुपये व्याज हवे असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी असावा. यासह तुम्हाला वार्षिक 5 टक्के दराने सुमारे 25 लाख रुपये व्याज मिळेल.

9/11

5 कोटी रुपये मिळविण्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक?

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

सध्या तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि रिटायर्टमेंटसाठी तुम्हाला 5 कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल तर आधी तुम्हाला किती व्याज मिळू शकते हे समजून घ्यावे लागेल. NPS वर सरासरी 10 टक्के व्याज सहज उपलब्ध आहे. 

10/11

दरमहा 22 हजार 150 रुपये गुंतवणूक

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

तुम्ही एनपीएसमध्ये दरमहा सुमारे 22 हजार 150 रुपये गुंतवले तर 30 वर्षांत तुमचे पैसे वार्षिक 10 टक्के व्याज दराने सुमारे 5 कोटी रुपये होतील.

11/11

कंपाउंडिंग पॉवर

NPS get 2 lakh pension after retirement investment tips National Pension Sceme Financial Planning

कंपाउंडिंगच्या पॉवरमुळे हे शक्य होईल. या 30 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 79.74 लाख रुपये असेल. यावर तुम्हाला सुमारे 4.21 कोटी रुपयांचे व्याज मिळेल.