मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) याचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितनुसार सिद्धार्थ शुक्ला याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर त्याच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स होते पण तो अशाप्रकारे निघून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सिद्धार्थने दोन मोठे बॉलिवूड चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. स्वत:च्या हिमतीवर सिद्धार्थ शुक्लाने आपलं विश्व उभारलं होतं.


सिद्धार्थ शुक्लाची संपत्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची एकूण संपत्ती $ 1.5 दशलक्ष आहे, म्हणजेच 11.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. टीव्ही अभिनेता म्हणून ही मोठी रक्कम आहे. त्याची बहुतेक कमाई टीव्ही शो आणि मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून आली. त्याची मासिक कमाई 10 लाखांपेक्षा जास्त होती.


सिद्धार्थ शुक्लाचं घर


सिद्धार्थचं मुंबईत अलिशान घर होतं, या घरात तो आपल्या कुटुंबासह राहत होता. बिग बॉस जिंकल्यानंतर त्याने हे घर खरेदी केलं. त्याची आईही त्याच्यासोबत या घरात राहत होती. सिद्धार्थचा मृत्यू झाला तेव्हा त्या घरातच होत्या.


सिध्दार्थला महागड्या गाड्यांची आवड


सिद्धार्थ शुक्लाला गाड्यांची खूप आवड होती. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स 5 (BMW X5) आणि हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉब मोटारसायकली देखील होत्या. एकदा त्याच्या या बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाला होता आणि त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनलाही जावं लागलं होतं.


रियालिटी शोमध्ये विजेता


सिद्धार्थने 'झलक दिखला जा', 'सावधान इंडिया', 'इंडियाज गॉट टॅलेंट' सारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केलं. 'खतरों के खिलाडी सीझन 7' च्या विजेत्या सिद्धार्थ शुक्लाला 25 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली होती. 'बिग बॉस 13' सिझनचा तो विनर होता. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली.



कमाईचा काही भाग करायचा दान


सिद्धार्थ शुक्ला त्याच्या कमाईचा काही भाग दान करायचा. लोकांच्या मदतीसाठी तो नेहमी पुढे होता. पण कदाचित नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होतं आणि सिद्धार्थने लवकरच जगाला निरोप दिला


सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवालानंतर सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनं चाहते भावूक झाले आहेत. 


इंस्टाग्रामवर सिद्धार्थची अखेरची पोस्ट 


सिद्धार्थ शुक्ला यांचं शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सिद्धार्थ शुक्लाने 24 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थ शुक्लाने आपला फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,'सगळ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना धन्यवाद!' तुम्ही तुमचं आयुष्य संकटात टाकता. खूप वेळ तुम्ही काम करता. तुमच्यामुळे रूग्णांना आराम देतो. कुटुंबापासून लांब राहतात. तुम्ही वास्तवात खूप शूर आहात.