मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू होत्या. शिवसेनेतून बंडाळी केलेल्या एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आज संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटला भाजपनेते नितेश राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र ट्विट करीत भाजपला डिवचले. त्यानंतर काही वेळात भाजपचे नितेश राणे यांनीदेखील संजय राऊत यांना ट्विट करीत उत्तर दिले. 




सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता संजय राऊत यांच्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र पोस्ट केले. त्यावर उत्तर देताना नितेश राणे यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांचे व्यंगचित्र पोस्ट केले. या दोन्ही नेत्यांच्या पोस्टवर अनेक सोशलमीडिया युजर्स कमेंट करीत आहे.


संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका


शिंदे गटाला नव्या सरकारमध्ये धुणीभांडी करावी लागणार आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आपण महाविकास आघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री केला याचा अभिमान आहे. पण शिंदे गटाने शिवसेनेचा मुख्यमंत्री केला का असा सवाल त्यांनी केला.