IPL Auction 2025 Rules: कोणाकडे सर्वाधिक पैसा? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या लिलावाचे 7 महत्त्वाचे मुद्दे

IPL Mega Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. हे मेगा ऑस्कन 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियात होणार असून यात 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. 31 ऑक्टोबर रोजी फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली यात अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिलीज न केल्याने ते आता ऑस्कनमध्ये दिसणार आहेत. यंदाच्या मेगा ऑक्शनमधले 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात. 

| Nov 10, 2024, 15:18 PM IST
1/7

IPL 2025 मेगा ऑक्शन कधी आणि कुठे :

आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे होणार आहे. आयपीएल ऑक्शन दुसऱ्यांदा परदेशात आयोजित करण्यात आले असून २०२४ चं मिनी ऑक्शन सुद्धा दुबईत झाला होता. आतापर्यंत बीसीसीआयने लिलावाच्या वेळेबाबत माहिती दिलेली नाही. मात्र त्याच दिवशी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याचा तिसरा आणि चौथा दिवस असल्याने कदाचित मेगा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी होऊ शकतो.

2/7

ऑस्कनमध्ये यंदा किती खेळाडूंनी घेतला सहभाग?

IPL मेगा ऑक्शनसाठी जगभरातून एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली. आता ही यादी आयपीएल आणि फ्रँचायझी यांच्यातील चर्चेमुळे कमी होणार आहे. प्रत्यक्ष ऑक्शनसाठी 500 ते 600 खेळाडू निवडले जाऊ शकतात. नोंदणी केलेल्या 1574 खेळाडूंमध्ये 320 कॅप खेळाडू, 1224 अनकॅप खेळाडू आणि असोसिएट नेशन्समधील 30 खेळाडूंचा समावेश आहे. 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्ष आयपीएलसाठी एकूण 204 स्लॉट्स आहेत. 

3/7

कोणत्या देशातील किती खेळाडूंनी मेगा ऑक्शनसाठी नोंदवली नावं :

मेगा ऑक्शनसाठी विदेशातील खेळाडूंमध्ये सर्वाधिक नोंदणी ही दक्षिण आफ्रिकेची खेळाडूंनी केलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील 91 खेळाडूंनी नोंदणी केलेली आहे. यानंतर यादीत ऑस्ट्रेलियाचे 76  खेळाडू आहेत. IPL च्या लिलावासाठी पहिल्यांदाच एका इटालियन खेळाडूनेही नोंदणी केलेली आहे. याशिवाय अमेरिका, यूएई, स्कॉटलंड आणि कॅनडाच्या खेळाडूंनी देखील मेगा ऑक्शनसाठी आपल्या नावांची नोंदणी केलेली आहे. या देशाच्या खेळाडूंनी केली नोंदणी : साउथ अफ्रीका 91, ऑस्ट्रेलिया 76, इंग्लंड 52, न्यूझीलंड 39, वेस्टइंडीज 33, श्रीलंका 29, अफगानिस्तान 29, बांग्लादेश 13, नेदरलँड 12, अमेरिका 10, आयर्लंड 9, झिम्बाब्वे 8, कॅनडा 4, स्कॉटलंड  2, इटली 1, यूएई 1.

4/7

कोणत्या टीमकडे किती स्लॉट्स रिकामे?

प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या संघात 25 खेळाडूंचा सहभाग करू शकतात. संघातील खेळाडूंची किमान संख्या 18 असणार आहे. 10 संघांमध्ये सर्वाधिक 250 खेळाडू असू शकतात यापैकी संघांनी 46 खेळाडूंना रिटेन केलेलं आहे. ज्यामुळे आयपीएल ऑक्शन दरम्यान केवळ 204 स्लॉट्स उपलब्ध आहेत. प्रत्येक संघात जास्तीत जास्त आठ विदेशी खेळाडू असू शकतात, त्यामुळे ऑक्शन परदेशी खेळाडूंसाठी 70 स्लॉट उपलब्ध आहेत.  चेन्नई सुपरकिंग्स : 20 स्लॉट (7 विदेशी), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 22 स्लॉट (8 विदेशी), सनरायजर्स हैद्राबाद 20 स्लॉट (5 विदेशी), मुंबई इंडियन्स 20 स्लॉट (8 विदेशी), दिल्ली कॅपिटल्स 21 स्लॉट (7 विदेशी), राजस्थान रॉयल्स 19 स्लॉट (7 विदेशी), पंजाब किंग्स 23 स्लॉट (8 विदेशी) कोलकाता नाईट रायडर्स 19 स्लॉट (6 विदेशी), गुजरात टायटन्स 20 स्लॉट (7 विदेशी), लखनऊ सुपर जाएंट्स 20 स्लॉट (7 विदेशी)

5/7

मेगा ऑक्शनसाठी कोणत्या संघाकडे किती पैसे?

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे एकूण 120 कोटी असतात. यापैकी काही पैसे हे खेळाडूंना रिटेन करण्यासाठी खर्च केले जातात आणि इतर रक्कम ही मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी वापरली जाते.  पंजाब किंग्स - 110.5 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 83 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स - 73 कोटी, गुजरात टायटन्स - 69 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स - 69 कोटी, चेन्नई सुपर किंग्स - 55 कोटी, मुंबई इंडियन्स - 45 कोटी, कोलकाता नाइट राइडर्स - 51 कोटी, सनराइजर्स हैदराबाद - 45 कोटी, राजस्थान रॉयल्स - 41 कोटी. 

6/7

काय आहे RTM Card चा नियम :

RTM म्हणजे राइट टू मॅचचा नियम हा सर्वात आधी 2018 मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये लागू करण्यात आला होता. यात जर कोणती टीम त्यांच्या खेळाडूला ऑक्शनपूर्वी रिटेन करू शकली नाही तर या स्थितीत ऑक्शनच्यावेळी त्याला पुन्हा एकदा आपल्या टीममध्ये परत घेण्याची संधी त्यांना मिळेल. परंतु यासाठी त्या खेळाडूवर दुसऱ्या फ्रेंचायझीने जी बोली लावली असेल त्याच रकमेच्या बोलीवर त्यांना त्या खेळाडूला आपल्या संघात घ्यावे लागेल. ही किंमत त्या खेळाडूला मिळालेल्या आधीच्या किंमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.  उदाहरण पाहायचं झालं, मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी ईशान किशनला रिटेन केलेले नाही तेव्हा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने ईशानला आपल्या संघात घेण्यासाठी बोली लावली आणि त्याला खरेदी केले तर मुंबई इंडियन्स आरटीएम कार्ड वापरूम ईशानला त्याच किंमतीत आपल्या टीममध्ये पुन्हा एकदा सामील करू शकते. पण त्यासाठी मुंबईला पंजाबने ईशानला खरेदी करण्यासाठी जेवढी बोली लावली तेवढ्याच पैशांनी त्याला विकत घ्यावे लागेल. 

7/7

कोणत्या संघाकडे किती RTM Card?

चेन्नई सुपर किंग्स - 1 (कॅप/अनकॅप), मुंबई इंडियन्स - 1 (अनकॅप) , कोलकाता नाइट राइडर्स - 0, राजस्थान रॉयल्स -0, सनराइजर्स हैदराबाद - 1 (अनकॅप), गुजरात टायटन्स  - 1 (कॅप), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 3 (1 अनकॅप खेळाडू आणि 2 कॅप खेळाडू किंवा तीन कॅप खेळाडू ), दिल्ली कॅपिटल्स - 2 (एक अनकॅप खेळाडू आणि 1 कॅप खेळाडू, या 2 कॅप खेळाडू), पंजाब किंग्स - 4 (कॅप), लखनऊ सुपर जायंट्स - 1 (कॅप).