मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवरुन युद्ध रंगलं आहे. औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधण्यासाठी झाडं तोडली जाण्याच्या प्रस्तावित बातमीनंतर अमृता फडणवीसांनी ट्विट केलं आहे. दांभिकपणा हा रोग आहे. 'जेव्हा तुम्हाला कमिशन मिळतं, तेव्हा तुम्हाला झाडं तोडलेली चालतात. या पापाला क्षमा नाही. गेट वेल सून शिवसेना,' असं ट्विट अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस यांच्या टीकेला प्रियंका चतुर्वेदी यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'सॉरी, तुमचा अपेक्षाभंग झाला. पण एकही झाड कापलं जाणार नाही, हे सत्य आहे. महापौरांनीही याला दुजोरा दिला आहे. रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे. गेट वेल सून.'



आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीला शिवसेनेनं विरोध केला होता. त्यानंतर सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यान निवडण्यात आलं होतं. पण हे स्मारक बांधण्यासाठी झाडं तोडावी लागणार आहेत. त्यामुळे शिवसेना याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


औरंगबादच्या सिडको भागात हे प्रियदर्शनी उद्यान आहे. या भागात 10 हजारावर झाडं आहेत. 17 एकर परिसरात हे उद्यान पसरलं आहे. याठिकाणी 70 प्रजातींचे पक्षी. 50 पेक्षा अधिक प्रकाराची फुलपाखरं, अनेक छोटे मोठे प्राणी हे याचं वैभव आहे. मात्र हेच वैभव आता संकटात येणार आहे. कारण महापालिकेनं केलेल्या ठरावानुसार येथं शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे.


या प्रकल्पाचा एकूण खर्च 64 कोटी रुपये आहे. उद्यानाचा परिसर 17 एकरमध्ये पसरला आहे. पुतळ्याची जागा 1135 स्क्वेअर मीटर आहे. फुड पार्कसाठी जागा 2330 स्क्वेअर मीटरची असणार आहे. संग्रहालसाठी 2600 स्क्वेअर मीटरची जागा आहे. तर मनोरंजनासाठी मोकळी जागा 3690 स्क्वेअर मीटरवर असणार आहे.


शिवसेना-भाजपमधील युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.