मुंबई : गोरेगाव येथे आंतरराष्ट्रीय हिरे प्रदर्शन भरले होते. मात्र, याची माहिती असलेले दोन चिनी नागरिक चोरीच्या उद्देशाने थेट मुंबई गाठली. हात चलाखी करुन खरा हिरा लंपास करत नकली हिरा तेथे ठेवून पोबारा केला. दरम्यान, वनराई पोलिसांनी विमानतळावर त्यांना बेड्या ठोकल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरेगावमधील नेस्को मैदाना आंतरराष्ट्रीय हिरे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनातून लाखो रुपये किमतीचा एक हिरा चोरून दोन चिनी नागरिक पसार झालेत. स्टॉल्स आवराआवरी करताना एक हिरा चोरीला गेल्याची बाब लक्षात येतात याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन प्रदर्शनातील सीसीटीव्ही फुटेज पाहली. यावेळी दोघे स्टॉल्सजवळ रेंगाळताना दिसलेत. त्यानंतर हे फुटेज पाहिल्यानंतर वेगाने तपास करत विमानतळावरुन चिनी नागरिकांना ताब्यात घेतले.


चियांग चांग क्विंग आणि डेंग झियाबो अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्या सामानातील शॅम्पूच्या बाटलीतून चोरलेला ५.४३ कॅरेटचा, ३४ लाख रुपये किमतीचा हिरा जप्त करण्यात आला. दुभाषाच्या मदतीने चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील शॅम्पूच्या एका छोटय़ाशा बाटलीत चोरलेला हिरा सापडला. तसेच दोन ते तीन खोटे हिरेही सापडले.


इंडिया इंटरनॅशनल जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशनने हे प्रदर्शन भरवले होते. प्रदर्शनात देशाबाहेरूनही सराफा व्यावसायिक हिरे, हिरेजडित दागिने घेऊन सहभागी झाले होते. या प्रदर्शनाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या सशस्त्र जवानांचा बंदोबस्त होता. तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवेश नव्हता. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी, शुल्क भरणे आवश्यक होते.