मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय. दहीहंडी साजरी करताना तब्बल १९४ गोविंदा जखमी झालेत... तर तीन जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघरमधल्या धनसार गावात दहीहंडीसाठीच्या थरावरुन पडून १८ वर्षांच्या रोहन किणी याचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे ऐरोलीत गोविंद पथकातील ३४ वर्षीय जयेश सारळे यांचा शॉक लागून मृत्यू झालाय. तर न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहीहंडी खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेला महेश फड हा १७ वर्षीय तरुण बुडाला. 


दहीहंडी साजरी करताना मुंबईत १९४ गोविंदा जखमी झाले. यापैंकी १७९ गोविंदांना उपचार देऊन सोडण्यात आलं... तर १५ जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


सायन रुग्णालयात ११ गोविंदांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्या डोक्याला दुखापत झालीय. तर केईएम रुग्णालयात १५ गोविंदांना दाखल करण्यात आलंय. तर राजावाडी रुग्णालयात तीन जणांवर उपचार सुरू आहेत. केईएम रुग्णालयात अनेक गोविंदावर उपचार सुरु असून अनेकांना उपचार करुन घरी सोडून देण्यात आलंय.


दहीहंडी फोडताना जखमी होणाऱ्या गोविंदांना तातडीनं प्रथमोपचार मिळावेत यासाठी परळच्या कैलासवासी रवींद्रभाई भोसले मंडळातर्फे केईएम रुग्णालय आवारात मदतकक्ष उभारण्यात आले होते.