मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांनी सकाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री इथे भेट घेतली होती.  मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर (Subhash Talekar) यांच्या सोबत काही डब्बेवाले उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते. पण आता डब्बेवाल्यांचे प्रवक्ते यांनी कोणत्याच राजकीय पक्षाला समर्थन दिले नसल्याचं म्हटलं आहे. (Support Shivsena Uddhav Thackeray)


मुंबई डबेवाले प्रवक्त्यांना नकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई डबेवाले (Mumbai Dabbewala) प्रवक्ता विष्णू काळडोके यांनी म्हटले की, 'मुंबई डबेवाल्यांचा कोणत्याच राजकीय पक्षाला पाठिंबा नाही. सुभाष तळेकर यांनी आज उद्धव ठाकरेंना समर्थन दिले. पण सुभाष तळेकर डबेवाल्यांच्या नावाचा वापर करत आहेत. त्यांचा डबेवाला संघटनेशी संबंध नाही.'


सुभाष तळेकर यांनी म्हटलं होतं की, 'आज आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत, उद्धव ठाकरेंनी आम्हाला काही अश्वासन दिली होती. त्यातील काही पूर्तता झाली आहें काहींची झाली नाही ते मला पत्र द्या असं उद्धव साहेब म्हणाले. आम्हाला शिवसेनेत काम करण्याची इच्छा आहे. उद्धव साहेबांकडे बोललो आहे, त्यांनी संधी दिली तर आम्ही सक्रिय होऊन काम करू आणि संधीच सोन करु.'


शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता मुंबईच्या डब्बेवाल्यांमध्ये देखील राजकीय भूमिकेवरुन फूट पडलेली पाहायला मिळतेय.