मुंबई : गुजरातने (Gujrat) महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाट्याला असलेला टाटा एअरबस प्रकल्प (Tata Air Bus Project) पळवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच पेटलंय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर दुसऱ्या बाजूला राज्याच्या वाटेला आलेले प्रकल्प परराज्यात का गेले, कसे गेले आणि कुणामुळे गेले याबाबत जाणून घेण्यासाठी राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबाबतची घोषणा केलीय. (uday samant announcement that maharashtra government will issue a white paper on why industry moved out of state)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आधी वेदांता, एअर बस, मेडिकल डिवाइस, बल्क ड्रॅग प्रोजेक्ट हे महत्वाचे प्रकल्प राज्यबाहेर का गेले, कुणामुळे गेले हे महाराष्ट्रातील जनतेला समजणं गरजेचं आहे. विद्यमान सरकर सत्तेत आल्यापासून 3 महिन्यात एकही प्रकल्प गेलेला नाही. जे प्रकल्प गेले आहेत ते आधीच्या सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे गेले आहेत त्यामुळे राज्य सरकार लवकरच श्वेतपत्रिका काढण्याच्या तयारीत आहे. दूध का दूध पाणी का पाणी होणार", असं उद्योगमंत्र्यानी स्पष्टपणे सांगितलं. उद्योगमंत्र्यांनी ठाण्यात शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस ते बोलत होते.


तसेच उद्योग राज्यात टिकावे यासाठी मागील सरकारच्या काळात हाय पावर किंवा केबिनेटच्या उपसमितीची एकही बैठक झाली नाही. राजकारण केले जात असल्याचा आरोपही सामंतांनी केला. 


विरोधकांना सत्ता गेल्याचा राग


"विरोधकांना सत्ता गेल्याचा राग आला आहे. मात्र आमचं सरकार आल्यानंतर मागील 3 महिन्यात एकही प्रकल्प परत गेलेला नाही", असंही सामंतानी स्पष्टपणे नमूद केलं.


राज्यात 10 प्रकल्प


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून विकासकामांचा धडाका लावलाय. मात्र विरोधकांना हे पटत नाही. महाराष्ट्रात उद्याोग टिकावे राहावे यासाठी  मुख्यमंत्रांनी एक बैठक सुद्धा घेतली होती. दरम्यान 10 नवीन प्रकल्प राज्यात येत आहेत, याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल. तसेच येत्या काही दिवसात राज्यात अजून मोठे प्रकल्प आणून दाखवू, असा विश्वास सामंत यांनी माध्यमांना संबोधित करताना व्यक्त केला.