मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची भेट झालेली नाही. कोणतही अफवा पसरविण्याचे काम करत आहे, असे उद्धव यांच्यावतीने शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी असे ट्विट केले आहे. दरम्यान, काँग्रेस - राष्ट्रवादीची सकारात्मक चर्चा सुरू आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एका बाजुला सत्तास्थापनेसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या बैठकांची सत्र सुरू झाले असले तरी आठ दिवस थांबा असे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती पुढे आली होती. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही पटेल यांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचे सांगण्यात येत होते. यावर संजय राऊत यांनी ट्विट करत अशी कोणतीही भेट झालेली नाही, असे स्पष्ट केले आहे.




संजय राऊत यांनी रात्री १० वाजून २६ मिनिटांनी  ट्विट करत उद्धव यांच्यावतीने स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव आणि अहमद पटेल यांची बैठक झाली आणि आम्हाला काही बाबतीत आश्वस्त करण्यात आले, यात काहीही तथ्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आमची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारात्मक होत आहे, असे राऊत यांनी  ट्विट केले आहे.