मुंबई : नव्या मंत्र्यांच्या बंगले वाटपानंतर आता मंत्रालयातील दालनांचेही वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील ६०१ क्रमांकाच्या दालनातून राज्याचा कारभार चालवणार आहेत. तसेच अन्य मंत्री कोणत्या मजल्यावरील, कोणत्या दालनात बसणार आहेत, याचीही उत्सुकता आहे. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील हे सहाव्या मजल्यावर असणार आहेत. त्यांना येथेच दालन देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळाचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील मंत्र्याना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता मंत्र्यांच्या दालनाचे वाटप करण्यात आले आहे. मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांना वर्षा बंगला देण्यात आला आहे. तसेच राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सरकारी बंगला देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता 'वर्षा' हा बंगला सोडावा लागणार आहे. आता या बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार आहेत.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकार राज्यात आल्यानंतर गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे सरकारने बहुमत चाचणीही जिंकली. तसेच विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली. फडणवीस यांच्या नावाची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. आता ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.


खालील प्रमाणे वाटप करण्यात आले


१. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - सहावा मजला, मुख्य इमारत - ६०१


२. जयंत पाटील - विस्तार, सहावा मजला, ६०७


३. सुभाष देसाई - मुख्य इमारत, मध्य बाजू - पाचवा मजला - ५०२


४. डॉ नितीन राऊत - मुख्य इमारत, मध्य बाजू, चौथा मजला, ४०२


५. एकनाथ शिंदे - विस्तारित - तिसरा मजला, ३०२ ते ३०७


६. छगन भुजबळ - मुख्य इमारत, मध्य बाजू, दुसरा मजला, २०२


७. बाळासाहेब थोरात, विस्तार, पहिला मजला, १०८