मुंबई : भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील (Bhandup corona centre fire) कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीच्या घटनास्थळी जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाहणी केली. या घटनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मुंबई महापालिकेचे (BMC) झालेले अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडाऱ्यात नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात आरोग्य केंद्र, हॉस्पिटलमध्ये फायर ऑडीटचे आदेश दिलेले. मग इथे फायर ऑडीट का झाले नाही? या इमारतीला ओसी नसताना इथे कोविड सेंटर सुरूच कसे करण्यात आले, असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे. 


या इमारतीतून बचाव करण्यासाठी रेस्क्यूचा पर्यायही धड नव्हता. त्यामुळे रुग्णांनाही स्वत:चा जीव वाचवता आला नाही, तसेच अग्निशमन दलालाही बचावकार्यात अडथळे आले. त्यामुळे एकंदरीतच याला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार आहे. आगीप्रकरणी सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराने पोखरून गेली आहे, त्यामुळे न्यायालयानेच सुओ मोटो घेऊन याप्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंतीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.