मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निकषांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रीगटात एकमत झाल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीत अधिकाधीक शेतकऱ्यांचा समावेश आणि राज्याची आर्थिक परिस्थिती याच्यात समतोल साधण्याबाबत पाटलांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. कर्जमाफीच्या निकषांवर ज्येष्ठ नेत्यांशी वैयक्तिकरित्या चर्चा करण्यात आली. त्यामुळं आता कर्जमाफीच्या निकषांवर बैठका होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 


या बैठकीला परिवहनमंत्री दिवाकर रावतेही उपस्थित होते. यापूर्वीही चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख आणि उद्धव ठाकरेंमध्ये निकषांबाबत चर्चेची पहिली बैठक मातोश्रीवर झाली होती.  


तत्पूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुनगंटीवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वृक्षारोपण कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं.