मुंबई : राज्याचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. शिवसेना नेत आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे राज्यात सत्तांतर अटळ आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठक पार पाडली. या बैठकीच्या शेवटी ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. त्यावेळी राजकीय गुन्हे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी ५० हजार अनुदान मंजूर करण्यात आले. १ जुलै पासून या योजनेचा अंमलबजावणी होणार आहे. 


बैठकीच्या शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेट बैठकीत सर्वांना म्हणाले की, या पुढे सहकार्य राहू द्या - धन्यवाद.. 


मुख्यमंत्र्यांनी शेवटी केलेल्या विधानाचा नक्की अर्थ काय? यावर राजकीय चर्चा सुरू आहेत.
 


बंडखोरांना शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा, थेट पत्राद्वारे कडक सूचना


 Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे बंडाचे निषाण फडकवलेले आमदरात वर्षा बंगल्यावर संध्याकाळपर्यंत पोहोचणार का, याचीच उत्सुकता लागली आहे.


शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आमदारांना सूचना जारी करण्यात आल्या आहे. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हा व्हिप जारी करण्यात आला आहे. पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुले राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता तातडीची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना शिवसेनेकडून करण्यात आल्या आहेत.


या बैठकीला उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदसत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल आणि परिमाणी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रेसंदर्भात असलेल्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.