मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झालाय... कानडी जनतेनं या निवडणुकीत काँग्रेसला नाकारत भाजपला संधी दिलीय. भाजपनं जवळपास निर्णायक आघाडी मिळवल्याचं आकडे सांगत आहेत. या निकालानंतर शिवसेनेच्या गोटातही धडकी भरलीय. कर्नाटक निकालानंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. खुद्द उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार शिवसेना भवन इथं ही महत्त्वाची बैठक अचानक बोलावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीसाठी मंत्री, आमदार, नगरसेवकांना आणि पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित झालेत. कर्नाटक निकालानंतर पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत डावपेच आखण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. 


'राज की बात'


दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजय मिळवला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे हे आधीपासून भाजपाच्या ज्या गोष्टीवर आक्षेप घेत होते, किंवा संशय व्यक्त करत होते, त्याचा आधार घेत त्यांनी पुन्हा हे वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जोडण्यावरून प्रचंड विरोध केला आहे. अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयावर राज ठाकरे यांनी अवघ्या एका शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत, विजयोत्सवात रंगलेल्या भाजपाला टोला हाणला आहे. राज ठाकरे यांनी भाजपाचा कर्नाटकात झालेल्या विजयावर म्हटलं आहे, 'एव्हीएममशीन की जय!'. राज ठाकरे हे नेहमीच आपल्या सभांमधून भाजपांचा, मोदींचा तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा समाचार घेत असतात. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील कार्याची वाहवा करणारे पहिले नेतेदेखील राज ठाकरेच होते.