मुंबई : कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता, दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करावी,शिवसेना त्यांच्या सोबत असेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वेळा पूर्वी त्यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे कमला मिल अग्नितांडव मुद्याला हात घातला.


कमला मिल प्रकरणी कारवाई करताना विरोधी पक्षाच्या बड्या नेत्याचा दबाव टाकण्यासाठी फोन आल्याचे आयुक्तांनी सांगितले होते.


आपल्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसल्याने आपण त्याचे नाव सांंगू शकत नाही असेही त्यांनी सांगितले होते. 


'भीमा कोरेगाव'बद्दल नंतर बोलू 


भीमा कोरेगाव प्रकरणी यावेळी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी भीमा कोरेगाव आणि महाराष्ट्रतल्या इतर विषयांवर नंतर बोलू असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल. 


एक लाखाचं बक्षीस 


कमला मिल अग्नीतांडवाला जबाबदार असलेल्या वन अबव पबच्या तिघा मालकांना मुंबई पोलिसांनी फरार घोषित केलं आहे.


त्यांचा ठावठिकाणा देणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस ना. म.जोशी मार्ग पोलिसांनी जाहीर केलं आहे.