मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बैठकांवर जोर दिसून येत आहे. मुंबईत बैठक झाल्यानंतर आता दिल्लीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत खलबते सुरु आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  उद्धव आमदारांशी करणार चर्चा करणार आहेत. दुसरीकडे शुक्रवारी 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक होणार आहे. उद्धव स्वत: आमदारांशी चर्चा करणार आहेत. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सत्ताकारणामुळे जी राजकिय संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हा सर्व संभ्रम निर्माण झालेल्या प्रश्नांवर विश्वासाने चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आता थेट संवाद होणार आहे. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत शिवसेना कोणता निर्णय घेणार, यावरच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे ठरणार आहे.


एका बाजुला सत्तास्थापनेचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल सुरू आहे. भाजपने शिवसेनेसारखा मोठा मित्र पक्ष गमावला असून भाजपच्या अंताची सुरूवात महाराष्ट्रातून होणार असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला आहे. यावेळी राऊत यांनी मोदींचा दाखला देत भाजपच्या इतर नेत्यांनीही पवार काय आहेत ते समजून घ्यावे, असा टोला लगावला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार बनेल आणि ते स्थिर असेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.