Uddhav Thackeray : ठाकरे गटाची मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेतली कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी (BMC Covid Centre Scam) ईडीकडून (ED) सध्या कारवाई सुरु आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी पीएम केअर फंडाचा (PM Care Fund) उल्लेख केला. PM केयर फंडाची चौकशी होत नाही तो काय हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे (Prabhakar More) केयर फंड आहे का? अगं शालू... तुम्हाला माहित आहे ना? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. अनेकांनी प्रभाकर मोरे केअर फंडात पैसे दिलेत का? ते पैसे गेले कुठे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड काळात पीएम फंडात करोडो रुपये गोळा झाले. पण आरोग्य सुविधा काय दिल्या? व्हेंटिलेटर (Ventilator) बिघडलेलं होते हे पाप कुणाचं होतं? कुणी याची खरेदी केली होती? तुम्ही आणची चौकशी करता, मग या घोटाळ्याची चौकशी कोण करणार?   टाटाने कोव्हिड काळात पीएम केअर फंडाला दीड हजार कोटी दिले होते, ते कुठे गेले?, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. समान नागरी कायदा म्हणतायत तर आम्ही मागणी करतो की ed, cbi चे अधिकार द्या आणि आम्ही सांगतो त्याची चौकशी करा. इथे उपरे बसले आहेत आणि मराठ्यांची राजधानी लूटत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यानी केला.


परिवारावर बोलाल तर?
पाटण्यातली बैठक हा मोदी हटाव नव्हे तर परिवार बचाव मेळावा असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल केली होती. जर मला बोलावं लागलं तर तुम्हाला शवासन करावं लागेल असा इशाराच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला आहे. देंवेद्र फडणवीस तुमचाही परिवार आहे. त्यामुळे परिवारावर बोलू नका. तुमच्या परिवाराचे काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. त्यावर बोलावं लागलं तर नुसतं शवासन करावं लागेल. इतर आसनं तुम्हाला झेपणार नाहीत. त्यामुळे माझ्या परिवारावर बोलू नका. त्याबद्दल मी संवेदनशील आहे. संपूर्ण महाराष्ट्र, शिवसैनिक माझा परिवार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. आता तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कोणी दुसरं घेत असेल तर मला माहिती नाही, असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 


म्हणून मुफ्तींच्या बाजूला बसलो?
भाजपला मेहबुबा मुफ्तींवरून टोले मारणारे उद्धव ठाकरे स्वतः मेहबुबा मुफ्तींच्याच बाजूला बसले अशी टीका काल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावरही उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. मेहबुबांच्या शेजारी मुद्दामच जाऊन बसलो असं ठाकरे म्हणाले. त्या लॅांड्रीतून हे स्वच्छ होवून आलेत ना. तुम्ही कसे गेल्यात त्यांच्याबरोबर असं मेहबुबा मुफ्ती यांना विचारलं. यावर त्या म्हणाल्या 370 कलम काढणार नाही असं वचन त्यांनी दिले होते आम्हाला.