मुंबई : मुंबईच प्रवेशद्वार असलेल्या चेंबूर पांजरापोळ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच उदघाटन केलं. यानंतर उपस्थित असलेल्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववर्षातला हा पहिलाच जाहीर कार्यक्रम शिवसेनेला साजेसा झाला, असे म्हणून त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षांवर शरसंधान केलं.


उद्धव ठाकरेंची टीका


कोरेगाव भीमा आणि त्याच्या पडसादावर बोलताना महाराष्ट्रात अदृश्य हात वातावरण बिघडवत आहेत. २०० वर्षा पूर्वी जे इंग्रजांनी केलं ते अदृश्य हात येऊन राज्यात आपल्याला आपसात भीडवतात. आगी लावण्याचं काम करत आहे. 


एकजूट होऊन विरोध


एकजूट होऊन याला विरोध केला पाहिजे असं ते म्हणाले. भगवा आणि निळा एकत्र येत असताना हे पाहून कोणाच्यातरी पोटात दुखतं. म्हणून ते असं षडयंत्र करत आहेत. जातीपातीच्या फूट पाडून राजकारण करत आहे याला शिवसेना विरोध करते असा घणाघात त्यांनी केला.