मुंबई : शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखावरून 2 लाख करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केल्याचं सूत्रांकडून समजतंय. आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीत शेतकरी कर्जमाफीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सर्व पक्षांशी चर्चा करुन एक चांगला प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. आजच मुख्यमत्र्यांसोबत बैठक घेऊन 91 लाख शेतक-यांना कर्जमाफी  देण्याबाबतचाप प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


या प्रस्तावामुळे राज्यातील सर्वसाधारण शेतकर-यांना फायदा होईल त्यासाठी प्रस्ताव तयार करताना पैशांची मर्यादा वाढवली तरी चालेल पण शेतक-यांना आर्थिक स्थैर्य आणि समन्वय साधण्यासाठी हा प्रस्ताव असून मंगळवारी होणा-या मंत्रीमंडळ बैठीत तो मांडण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.