OBC आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांची मध्यप्रेदशच्या मुख्यमंत्र्यांची `फोन पे चर्चा`
OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचे आदेश महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य निवडणूक अयोग्य आणि राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
मुंबई : सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेश ( Madhya Pradesh ) आणि महाराष्ट्र सरकारने ( Marashatra Govt. ) OBC आरक्षणासंदर्भात घेतलेले निर्णय रद्द केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान ( Shivrajsing Chouhan ) यांच्याशी फोन पे चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यात सुमारे १० मिनिटे ही चर्चा झाली. OBC आरक्षण महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या स्वार्थी राजकारणामळे मिळाले नाही अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौहान यांच्याकडे व्यक्त केली, असे या सूत्रांनी सांगितले.
तसेच, OBC आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य सरकार पुर्नविचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.
या दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चमधून काही सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.