Shivsena: नाव गेलं, चिन्ह गेलं आता आमदारकीही जाणार? भरत गोगावले यांनी स्पष्टच सांगितलं!
Maharastra Politics: भारत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
Shivsena Row: शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे राहील असा निर्णय केंद्रीय निवडणूक (ECI) आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget sessions) पार्श्वभूमीवर विधान भवनात बैठकीचं आयोजन केलं होतं. शिंदे गटाच्या सर्व आमदारांना या बैठकीला बोलावण्यात आलं होतं. मात्र, ठाकरे गटाचे आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होणार का?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.
आदित्य ठाकरेंची आमदारकी जाणार का?
भारत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे. व्हिप जुगारल्यास निलंबन होणार का? असा सवाल उपस्थित केल्यावर तो निर्णय बैठकीनंतर होईल. आमचे खासदार ठरवतील, असंही भारत गोगावले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची आमदारकी जाणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
आणखी वाचा - Maharashtra Politics : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; नाशिकमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल
दरम्यान, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. दिल्लीत प्रकरण सुरू असल्याचं शिरसाठ यांनी म्हटलं आहे .संजय राऊतांनी जे दोन हजार कोटींचे आरोप लावले आहेत. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सायको माणसाला उत्तर देण्याची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलंय.