मुंबई : उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट झाले आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. आज उद्धव ठाकरे यांच्याखेरीज प्रत्येक पक्षाचे दोन, असा सात जण शपथ घेतील, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे. ३ तारखेपूर्वी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असेही ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थावर जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई खास सेट डिझाईन करत आहेत. सामाजिक भान आणि भव्यता असा हा सेट असेल असं नितीन देसाई यांनी म्हटले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचा कारभार सुरळीत चालावा आणि तिन्ही पक्षांमध्ये एकसुत्रता असावी यासाठी यूपीएच्या धर्तीवर राज्यातही समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते असतील अशी माहिती सूत्रांनी दिली.


खातेवाटपात काँग्रेसच्या वाट्याला जादा कॅबिनेट मंत्रीपद आले आहे. महाराष्ट्र विकासआघाडीचा खातेवाटपचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रीपदं अशी १६ मंत्रीपदे आली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदं अशी १५ मंत्रीपदं आणि काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदे मिळणार आहेत आहेत.



दरम्यान, आधी काँग्रेसला ९ कॅबिनेट १ राज्यमंत्री मिळणार होते. आता एक कॅबिनेट पद वाढले आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात एक कॅबिनेट मंत्रीपद जास्तीचे मिळाले आहे. काल नवनिर्वाचित आमदारांचा काल शपथविधी पार पडला. २८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत २८५ सदस्यांना काल शपथ दिली गेली.