मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केलं. यानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्यासह, सहा मंत्र्यांना शपथ घेतली. आता महाराष्ट्र विकास आघाडीकडून उद्याच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे, आणि उद्याच विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे, ही बहुमत चाचणी उद्या पार पडणार आहे. 


महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. यात महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर पक्ष आणि अपक्षांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्र विकास आघाडीत एकूण 173 सदस्य आहेत.


महाराष्ट्र विकास आघाडी एकूण सदस्य 173
शिवसेना  (56)
राष्ट्रवादी  (54)
काँग्रेस   (44)
बहुजन विकास आघाडी (3)
प्रहार जनशक्ती पार्टी (2)
समाजवादी पार्टी(2)
कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)(1)
शेतकरी कामगार पक्ष(1)
क्रांतीकारी शेतकरी पक्ष (1)
स्वाभिमानी शेतकरी संघटना(1)
अपक्ष(8)


भाजपसह इतर विरोधी पक्ष
भाजप 105
जनसुराज्य 1
राष्ट्रीय समाज पक्ष 1
अपक्ष 5


इतर जे भाजप किंवा महाराष्ट्र विकास आघाडीसोबत नाहीत, किंवा ज्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही.
एमआयएम 1
मनसे 1