शिवसेनेचा धनुष्य रहाणार की मोडणार, निवडणूक आयोगाची 7 ऑक्टोबरबरची डेडलाईन
शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला याबाबतचा निकाल निवडणूक आयोग देणार आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं कुणाचे हा वाद आता निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला याबाबतचा निकाल निवडणूक आयोग देणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांना कागदपत्रं सादर करण्यासाठी सांगितलं आहे. मात्र आता शिवसेनेने कागदपत्रं जमा करण्यासाठी ठाकरे गटाला मुदत हवी असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समजतंय. (uddhav thackeray group will seek a few more days to file documents with the election commission source information)
निवडणूक आयोगाने कागदपत्रं जमा करण्यासाठी 7 ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे. मात्र ठाकरे गटाला मुदतवाढ हवी असल्याचं सूत्रांची माहिती आहे. दसरा मेळावा असल्यानं ७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं दाखल करणं शक्य नसल्यानं आणखी कालावधी मागून घेतला जाणार, असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे तशा प्रकारचे पत्र पाठवणार आहे.
त्यामुळे निवडणूक आयोग ठाकरे गटाची मागणी मान्य करत मुदतवाढ देणार का याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्यास ठाकरे गटासाठी हा दिलासा असेल.