COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारलीये. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात प्रधान आहेत. त्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून ते उद्धव यांची भेट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. सोमवारी नाणार प्रकल्पाबाबत करार झाल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झालीये. प्रकल्प समुद्रा बुडवण्याची भाषा शिवसेनेनं केलीये. हा विरोध बघता उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रधानांचा प्रयत्न आहे.


नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्याऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून जोरात सुरू आहे. हा करार करतांना मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना अंधारात ठेवले. याबाबत शिवसेनेनं निषेध-विरोध हा मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री यांच्यापुढे नोंदवला आहे. उद्या मुख्यमंत्री यांची उद्योगमंत्रीबाबत बैठक आहे तेव्हा याबाबत चर्चा होणार आहे.