Uddhav Thackeray Slams Election Commission: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission) निशाणा साधला आहे. मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din) मुंबईत (Mumbai) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी 'शिवसेना' (Shivsena) हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुन टोलेबाजी केली. हे चुनाव आयोग नसून चुना लगाओ आयोग आहे, असा शाब्दिक टोला उद्धव यांनी लगावला.


अमित शाहांचा मोगॅम्बो असा उल्लेख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंनी संस्कार चोरता येत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला टोला लगावला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ देताना शाह यांचा मोगॅम्बो असा उल्लेख करत टीका केली. "जसं मोगॅम्बो म्हणाला दूध का दूध पानी का पानी आम्ही करणार. नुसतं दूध का दूध पानी का पानी नाही तर तुमचं गोमूत्र कसं आहे ते सुद्धा आम्ही दाखवणार आहोत," असं उद्धव म्हणाले. तसेच राज्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी मराठी भाषा दिनाच्या दिवशीच हिंदीतून भाषण दिल्यावरुनही उद्धव यांनी टीका केली. "आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली. मी काही गेलो नव्हतो. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी हिंदीतून भाषण केलं. आज मराठी दिनाच्यानिमित्ताने तरी मराठीत बोलायचं. हिंदी, मराठी लिपी काही वेगळी नाही. आधीचे राज्यपाल नाटक म्हणून तरी मराठीत वाचायचे," असं उद्धव म्हणाले.


निवडणूक आयोग बोगसच


समोरची गर्दी पाहून उद्धव यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र याचसंदर्भातून त्यांनी निवडणूक आयोग बोगस असल्याचा टोला त्यांनी लगावला. "एवढ्या लोकांना पाहून बरं वाटलं. काय होतं लोक आता 'मातोश्री'वर येत आहेत. मधल्या काळात निवडणूक आयोगाने निकाल दिला. निवडणूक आयोग बोगसच आहे. त्याला निवडणूक चुना लगाओ आयोग का नाही म्हणत हाच मला प्रश्न आहे," असं उद्धव यांनी म्हणताच उपस्थित समर्थकांनी टाळ्या वाजवल्या. "आमचा विश्वास उडालेला आहे. तो निवडणूक चुनाव आयोग नाही चुना लावणारा आयोग आहे. असं कधी घडलेलं नव्हतं. ज्या ज्या पक्षांमध्ये वाद झाले तेव्हा असं घडलेलं नव्हतं. अगदी रामविलास पासवान यांच्या पक्षातही वाद झाला. किती वर्ष झाली हा वाद सुरु आहे. रामविलास पासवानच्या मुलाला एक चिन्ह दिलंय आणि काकाला एक चिन्ह दिलं आहे. हे देऊन ते शांत का बसलेत कारण हे दोन्ही गट भाजपा बरोबर आहे. जर तुमच्या मर्जीने सगळं करणार असाल तर ही हुकूमशाही देशात चालणार नाही," असं उद्धव म्हणाले.


सगळे एकजूट होत आहेत


"सर्व एकजूट होऊ लागलेत. केजरीवाल येऊन गेले. ममतादिदींचा फोन होता. नितीशजींचा फोन येऊन गेला. सगळे एकजूट होत आहेत. आता त्यांना माझं पटायला लागलं आहे की जर आपले डोळे उघडले नाही तर 2024 ची निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक असेल," असा उल्लेख उद्धव यांनी पुन्हा एकदा केला.


...म्हणून तर निवडणूक आयोगाने हा चोमडेपणा केलेले नसेल ना?"


"आम्ही ज्या घटनातज्ज्ञांशी बोलतोय त्यामध्ये काय केल्यास पात्र ठरणार आणि काय केल्यास अपात्र ठरणार हे अगदी स्वच्छ आहे. मी जास्त बोलणार नाही कारण सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सुनावणी सुरु असताना निवडणूक आयोगाने मध्येच चोमडेपणा करायची गरज नव्हती," असा टोलाही उद्धव यांनी लगावला. निवडणूक आयोगाच्या निकालाचसंदर्भ देत उद्धव यांनी, "माझ्या मनात शंका आली की मधल्या काळामध्ये जे केंद्रीय कायदामंत्री रिजज्जू जे म्हणाले त्यावरुन त्यांचं आणि न्यायालयाचं चाललं आहे. मध्यंतरी लोकसभेचे अध्यक्षही म्हणाले. स्वातंत्र्य सगळ्याचं मारुन टाकायचं. न्यायालय पण जर बुडाखाली आणलं तर लोकशाही टिकेल कशी? तो निर्णय कदाचित विरोधात जाऊ शकेल असं त्यांना वाटलं असेल म्हणून थेट तर बोलू शकत नाही. केंद्र सरकार थेट बोलू शकत नाही. न्यायालयातील न्यायाधिशांना केंद्र काही बोलू शकत नाही. त्यांना जर आपण अंमलाखाली घेऊ शकत नसू तर आपल्याला काय हवं आहे हे इनडायरेक्टली केंद्र सरकारला सांगायचं असेल म्हणून तर निवडणूक आयोगाने हा चोमडेपणा केलेले नसेल ना?" असा प्रश्न उपस्थित केला.


निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात फरक


निवडणूक आयोगाच्या निकालामधून "केंद्र सरकारची इच्छा ही आहे की यांच्या बाजूने तुम्हाला निकाल द्यायचा आहे. पण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यात फरक आहे.
सर्वोच्च न्यायालय ही एक शेवटची आशा आहे. निकाल हा केवळ शिवसेनेच्या भविष्याचा नसेल तर देशाच्या भविष्याशी असेल. ज्यांना स्वातंत्र्याच्या लढ्याशी काहीही संबंध नव्हता तेच स्वातंत्र्य मारायला निघालेत की काय असं म्हटल्याच वावगं ठरणार नाही," असंही उद्धव म्हणाले.