मुंबई : मंगळवारी मुंबईवर नऊ किलोमीटरचा ढग धोंधावत होता, हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य सोशल मीडियावर वायरल होताना दिसतंय. कारण, क्वचितच कुणी ढगाची उंची मोजली जाते, हे ऐकलं असावं.


नऊ किलोमीटर उंचीचा ढग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज होता परंतु, तो एवढा भीषण असेल याची क्वचितच कुणी कल्पना केली असेल... कालच्या पावसाबद्दल आठवलं की माझ्या अंगाचा थरकाप होतो, मुंबईवर त्यावेळी नऊ किलोमीटर उंचाचा ढग होता... तो फुटून ढगफुटी झाली असती तर आज आपण भेटूच शकलो नसतो' असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं.


यावरून, सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंना ट्रोल करणं सुरू झालं. फेसबुकवर  '९ किलोमीटर लांबीचा ढग जर साहेबांनी गच्चीवरून हाताने मुंबईबाहेर रेटला नसता तर आज मी नसतो. #Euuuu' असं रविंद्र शेडगे या युझरनं म्हटलंय तर 'बघतोस काय रागानं, ९ किलोमीटर ढग मोजलाय वाघानं' असं स्वप्नील ढवळे या युझरनं म्हटलंय तर 'उद्धव काका काल फोटोशूट करूक ढगात गेललेले तेव्हा त्यांका ९ किलोमीटरचो ढग दिसलो! फोटो धुऊक दिल्यानी आसात रविवारी भेटतीत!' असं वैभव चिंदरकर या युझरनं म्हटलंय. 


आता काय नवीन, ९ किलोमीटर उंचीचा ढग... अशा वक्तव्यांसहीत सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंना जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. पण, यामागचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.


'आयएमडी'च्या सूत्रांची माहिती


मुंबईवर खरोखरच नऊ किलोमीटर उंचीचा (जाडीचा) ढग होता... परंतु, अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले आणि त्यामुळे हे ढग गुजरातच्या दिशेने पुढे सरकले... आणि पुढचा धोका टळला, अशी माहिती भारत हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या सूत्रांनी दिलीय.