Uddhav Thackeray: देशात अनेक स्थानकांची, आस्थापनांची नावे बदलण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर जुमल्याचे नाव  मोदी गॅरंटी केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नाही पण घोटाळ्याचे आरोप असलेल्या कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, हे दुर्देव असल्याचेही ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाची सांगता झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. हा प्रवास निवडणुकीचा नाही तर भारतीय लोकशाहीचा आहे, असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंचे कौतुक केले. 


जनतेला आपल्याबद्दल विश्वास आहे. ईव्हीएम घोटाळ्यातून भाजप जिंकल्यास असंतोष निर्माण होईल. भाजपचे तोडा फोडा आणि राज्य कराचे धोरण असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.


 ही मोदी गॅरंटी 


कृपा शंकर सिंह यांना उमेदवारी देणे यातले सूत्र समजून घेतले पाहिजे. अजित पवार अशोक चव्हाण, कृपाशंकर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती. कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले आणि फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. त्यांनी गैर मार्गाने संपत्ती मिळवली असा आरोप होता, नंतर गृहमंत्री असतांना त्यांनीच क्लीन चिट दिली. तुरुंगात न पाठवता तिकीट दिले ही मोदी गॅरंटी आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाचे नेते संजय राऊत यांनी केली. 


अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट दिली ही मोदी गॅरंटी आहे. अशोक चव्हाण यांना तुरुंगात न टाकता राज्यसभा दिली ही मोदी गॅरंटी आहे. ज्यांना तुरुंगात टाकायचे त्यांना उमेदवारी दिली ही मोदी गॅरंटी आहे. 195 पैकी 70 लोक हे कृपाशंकर सिंह यांच्या सारखे आहेत. दुसऱ्या पक्षातील आहे भाजपकडे स्वतःचे काही नाही . इतके मोठे नेते आहेत त्यात भाजपकडे  स्वतःचे काय आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.


'फडणवीसांवर अब्रु नुकसानीचा दावा'


शिखर बँक घोटाळ्यात चक्की पिसायला अजित पवार यांना तुरुंगात पाठवणार होते. जवळपास चाळीस हजार कोटीचा घोटाळा होता. त्याचे काय झाले? पुरावे कुठे गेले? फडणवीस यांनी गिळले का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आता क्लीन चीट दिली असेल. गुन्हे दाखल झाले होते तरी क्लीन चिट कशी दिली? अजित पवार यांची बदनामी केली म्हणून सुनेत्रा पवार यांनी फडणवीस यांच्यावर खटला दाखल करायला हवा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.