मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट होणार आहे. 


काय होणार चर्चा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना उद्या ७ वाजता वर्षा या निवासस्थानी भेटणार आहेत. या बैठकीत कशाबाबत चर्चा होणार याकडे लक्ष लागले असतानाच भेटीत कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. नाणार प्रकल्पाच्या स्थानिकांच्या विरोधाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. 


कोण असणार सोबत?


उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई हे सुद्धा यावेळी चर्चेत असणार आहे. आता यावर सरकार काय उत्तर देतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण या मुद्द्यावरून सरकारमध्ये ब-याचदा खटके उडत आहेत.