Tejas Thackeray In Mva Protest Rally : राज्यात गेल्या (Maharashtra Politics) काही दिवसांपासून सातत्याने महापुरुषांचा अपमान होईल, अशी विधानं केली जात आहे. या विरोधात आणि निषेधार्थ महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व पक्षीयांचा आज हल्लाबोल मोर्चा काढण्यात आलाय. या महामोर्च्यात मविआतील अनेक दिग्गज नेते सहभागी झाले. मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा म्हणजे (Tejas Thackeray) तेजस ठाकरे. तेजस या मोर्च्यात सहभागी झाल्याने तो सर्वांच्यात चर्चेचा विषय ठरला. (uddhav thackeray wife and son rashmi and tejas thackeray participant in mva morcha at mumbai maharashtrta politics)
 
मविआच्या या मोर्च्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. यामध्ये मुलगा तेजस आणि पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा होत्या. अशा प्रकारच्या जाहीर मोर्चात रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि तेजस ठाकरे सहभागी झाले. याआधी अनेकदा तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं. आदित्य ठाकरे आमदार झाल्यानंतर तेजसला युवासेनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तसं अजूनही झालेलं नाही.


उद्धव ठाकरे कडाडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे महाराष्ट्राविरोधात वक्तव्य करणाऱ्या आणि राज्याचा अपमान करणाऱ्यांविरोधात चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. महाराष्ट्र्रद्रोह्यांच्या छातीवर चालणार अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली. 


देवेंद्र फडणवीस यांची टीका


दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या या मोर्चावर सडकून टीका केली. मविआचा हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरीत आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी हल्लाबोल केला.