मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या दौ-याची तयारी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे हे २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात उद्धव ठाकरे स्थानिक शेतकरी, कारखानदार, छोटे व्यापारी, उद्योजक अशा समाजातील विविध घटकांशी संवाद साधणार आहेत. या तिन्ही जिल्ह्यात जाहीर सभा आणि शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहे. 


मुंबईत राज ठाकरे यांची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांचा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौ-यात ते शेतक-यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या दौ-याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.