मुंबई : शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत. नंतर ही यादी घेऊन मी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना दाखवून जागांचे ठरवू, असे सांगत युतीच्या जागावाटप तिढ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोल लगवात उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, शिवसेना १३५-१३५ च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजप शिवसेनेला ११० ते ११६ जागा देण्यास राजी आहे. त्यामुळे युती होणार की नाही, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना - भाजप युतीच्या जागावाटपाची कोंडी फुटण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. जागा वाटपाच्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली उद्विग्न प्रतिक्रियेमुळे ही कोंडी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी युतीच्या जागावाटपाचा वेगळा मार्ग शिवसेनेने अवलंबला आहे. 


शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्र्यांनाच तयार करण्याचे सांगितल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. त्यामुळे जागा वाटपावर तोडगा निघत नसल्यामुळे उद्धव ठाकरे वैतागल्याचे दिसत आहे. त्यामुळे युती टिकणार की नाही याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.