मुंबई : जीएसटी दरांबाबत केलेला फेरविचार हा गुजरात निवडणुकपूर्व भ्रष्टाचार असल्याचा आरोप शिवसेनेनं सामनातून केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपवर पहिला वार केला आहे. 


नोटा बंदीने अर्थव्यवस्था उध्वस्त केली असून गुजरातमधील पराभवाच्या भीतीनं सरकारनं जीएसटीप्रकरणी झुकल्याचा आरोपही सामनातून करण्यात आलाय.  


काल औरंगाबादमध्य़े बोलतानाही उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती.