मुंबई : संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्व सण. उत्सव साध्या पद्धीत साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रांतीला दिशा देण्याचं काम आंबेडकरांनी केलं असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  महामानवाला अभिवादन केलं. ६४ वर्षांनंतर आज असा दिवस आला आहे. सर्व भीम बांधन नियमांचे पालन करत घरूनच आंबेडकरांना त्यांच्या विचारांना अभिवादन करत आहेत. खरा भीम सैनिक कसा असेल अशी ख्याती त्यांना आता पटली असले. असं मुख्यमंत्री म्हणाले. 


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायांचा जनसागर उसळतो. मात्र यंदा देशावर कोरोनाचं सावट आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.