प्रसाद काथे, कार्यकारी संपादक, झी २४ तास, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या मिसळ राजकारणाला झणझणीत फोडणी दिली आहे. राजेंनी त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्र राजे यांना दम देत सोबत राहायला सांगितलं आहे. ते झी २४ तासच्या 'मुक्तचर्चा' या विशेष कार्यक्रमात बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुक्तचर्चा या विशेष कार्यक्रमाचं संचालन कार्यकारी संपादक प्रसाद काथे यांनी केलं, तर वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनीही यात सहभाग नोंदवला. त्या प्रश्नांच्या सरबत्तीला यशस्वी तोंड दिलं. उदयनराजे भोसले यांनी. सातारा मिसळ प्रकरणाचा ठसका पक्षाच्या नेतृत्वाला लागला. साताऱ्याची मिसळ इतकी झणझणीत असते का? या प्रश्नावर दिलखुलास हसत राजे यांनी म्हटलं की, मिसळ खाणाऱ्या दोघांना ठसका लागावा अशी त्यांचीच योजना होती. कारण, त्यातल्या एकाला कळायला पाहिजे की, आपल्या बंधुराजेंच्या सोबत यायला हवं. असा आदेश देतानाच दिशाभूल करणाऱ्यांना लांब ठेवायला हवं असा सल्लाही त्यांनी शिवेंद्रराजे यांना दिला.


साताऱ्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये शिवेंद्रराजे यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत नुकतीच मिसळ खाल्ली. त्यानंतर, राज्यात एकच चर्चा होती की, उदयनराजे यांना घरातूनच आव्हान मिळत आहे. मात्र, हा आक्षेप खोडून काढत उदयनराजे यांनी सगळे त्यांच्यासोबत असतील असा दावा केला आहे.


पाहा काय म्हणाले उदयनराजे भोसले