मुंबई : झी २४ तासच्या 'मुक्तचर्चा' कार्यक्रमात साताऱ्याच्या मिसळ राजकारणावर उदयनराजेंनी झणझणीत फोडणी दिली आहे. बंधुराजांशी नीट वागा, असा थेट आदेशच उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजेंचे भाऊ शिवेंद्रराजे भोसले आणि साताऱ्याचे युतीचे उमदेवार नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यामध्ये एकत्र मिसळ खाल्ली होती. या मिसळीची चर्चा राज्यभरात रंगली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांच्या मिसळीच्या या कार्यक्रमावर उदयनराजे भोसले यांनी गमतीशीर उत्तर दिलं. 'साताऱ्याची मिसळ झणझणीत नसते, पण मिसळ बनवणारा माझा मित्र होता. त्याला मिसळीत तरी जास्त टाकायला सांगितली. अशी तरी टाक की ठसका लागला पाहिजे. ठसका असा लागला पाहिजे की त्यांना कळायला पाहिजे, की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. आपण आपल्या बंधूराजांबरोबरच राहिलं पाहिजे. दिशाभूल करणाऱ्यांना लांब ठेवलं पाहिजे.', असं उदयनराजे म्हणाले.


साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची नेहमीच चर्चा असते. या दोन्ही नेत्यांमधील संघर्षामुळे स्थानिक राजकारणात नेहमीच तणाव असतो. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला होता.


पाहा काय म्हणाले उदयनराजे भोसले