प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई :  भाजपच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद तुरुंगातपर्यंत पोहोचला आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यानंतर अमरावतीमध्ये उमेश कोल्हे (Umesh Kolhe Murder Case) यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एनआयएने सात आरोपींना अटक केली आहे. यातील आरोपी शाहरुख पठाण वर मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नुपूर शर्मांचे समर्थन केल्याप्रकरणी उमेश कोल्हेची हत्या केली म्हणून आरोपीला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.


नेमकं काय घडलं?


आरोपी शाहरुख पठाणवर पाच कैद्यांनी हल्ला करत त्याला जखमी केले आहे. आरोपी शाहरूख पठाण व इतर कैदी आर्थर रोड तुरुंगात बोलत होते. त्यावेळी कोणाला कोणत्या कारणावरून अटक झाली याबाबत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती.


यावेळी शाहरुख पठाण याने नूपुर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक झाल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यावेळी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण चव्हाण ऊर्फ आवन व संदीप जाधव या आरोपींनी पठाणवर हल्ला केला.



बराक नंबर 7 मध्ये हे कैदेत होते. त्याचवेळी एकाच बराकमध्ये असणाऱ्या आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे.


हल्ल्यानंतर जेल प्रशासनाने तात्काळ त्यांना बाजूला केलं आणि वेगळ्या बराकमध्ये हलवलं. यानंतर आरोपीना वेगवेगळ्या बराकमध्ये हलवण्यात आले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.