सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : सत्तेत जाण्यासाठी शिवसेनेनं (shivsena) हिंदुत्वाला मुठमाती दिली, आता आरत्या करून हिंदुत्व सिद्ध होत नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुंवर हल्ले होतात, तेव्हा शिवसेना कुठे असते, उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कुठे असतात, चालायची ताकद नाही तर हिंदुंचे अत्याचार हे काय वाचवणार अशा बोचऱ्या शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे.


आरत्या करुन, टाळ्या वाजवून आणि ढोल वाजवून हिंदुत्व सिद्ध होतं का असा सवालही नारायण राणे यांनी विचारला आहे. हिंदुत्व दाखवण्यासाठी काही तरी करायला लागतं, आणि ते हृद्यापासून पाहिजे, शिवसेनेचा सत्तेसाठी केवळ देखावा सुरु आहे. पण लोकं आतात भूलणार नाहीत, 2024 ला त्यांचा धुव्वा उडेल, असं भाकित नारायण राणे यांनी वर्तवलं आहे.


राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर आघाडीचे नेते टीका करत असतील, तर आदित्य अयोध्येला का जातायत असा सवालही नारायण राणे यांनी केला. 



कोल्हापुरात सर्व पक्ष एकत्र आले आणि भाजपची काही गणितं चुकली असतील त्यामुळे पराभव झाला असं विश्लेषण राणे यांनी केलं आहे.